Tuesday, May 25, 2010

च्यायला, सांगायचं कसं?

मला आज एक मित्र भेटला होता (नाव नका घ्यायला सांगू मैत्रिणींनो!!!) तो जरा hyper झाला होता. त्याला त्याच्या ’झेंगाटा’ला प्रपोज मारायचं होतं, पण ते कसं मारावं ते त्याला कळत नव्हतं. म्हणून तो मला विचारत होता (ह्यावरून त्याची ’चॉईस’ काय असेल ह्याचा अंदाज यावा). त्याच्या त्यावेळच्या मूडवरून सुचलेली ही कविता..

तिला सांगितल्याशिवाय, काही चैन पडत नाही,
न सांगायला, ती काय बहीण लागत नाही,
पण सांगायला गेलो तर,
होईल का हसं?
च्यायला, सांगायचं कसं?

आज तिला सांगायचंच , हा बेत ठरवला,
केसातून कधी नव्हे ते एकदा कंगवा फिरवला,
पण बघितल्यावर तिला,
नुसतं म्हटलं हॅलो कसंबसं,
च्यायला, सांगायचं कसं?

मित्रांनी काय, नुसते दिले फुकटचे सल्ले,
कुणी म्हणे बोकडदाढी, कुणी सुचविले कल्ले,
ह्या सगळ्या येडपटपणात,
माझं कोडं जसंच्या तसं,
च्यायला, सांगायचं कसं?

उद्या सांगू करत एक-एक दिवस सरत चालला,
जाणारा दिवस, अधिक अस्वस्थ करत चालला,
loves me, loves me not करत,
नुसती वाया घालवली पिसं,
च्यायला, सांगायचं कसं?

तिला सांगितलं नाही, तर ती मला कशी मिळणार?
माझ्या मनात काय आहे, तिला कसं कळणार?
प्ण सांगायला गेलो की होतं,
माझं तोंड एवढंसं,
अहो, कुणीतरी सांगा की,
च्यायला, सांगायचं कसं??

- प्रसाद

8 Comments:

At 8:24 PM, Blogger Shashank Kanade said...

हो हो हो - एक दिलखुलास हास्य.

[i] म्हणून तो मला विचारत होता [b](ह्यावरून त्याची ’चॉईस’ काय असेल ह्याचा अंदाज यावा)[/b] [/i]
अस्सं काय लब्बाडा!

 
At 10:00 PM, Blogger Makarand Mijar said...

he he ... bhaari re. :-)

tu hi wayaat alelaa distoyes ! ;P
barobar aahe, "saangaaycha kasa?" chi pahili shtep: "maajhyaa ekaa mitraalaa/ mitrane" hya naavaawar khapwaaycha.

go ahead !

 
At 10:03 PM, Blogger babulaal said...

masta aahe re chaphya :D

 
At 12:41 AM, Blogger Prasad Chaphekar said...

@shankya.. thanks for dilkhulas hasya.. agdi 'Sakal'cha wartahar aslyasarkha lihila aahes..

@mak: tu he wisartos ki me aadhi sangitla aahe.. tyamuLe kasa sangaycha he mahit nasla tar kasa sangaycha nahi he nakkich mahit aahe.. :)

 
At 6:16 AM, Blogger Bipin said...

प्रपोज़ कसं करायचं हे तुला विचारणं म्हणजे स्वर्गात कसं जायचं हे सैतानाला विचारण्यासारखं आहे. :P

 
At 7:07 AM, Blogger Swanand said...

agree with bipin... :D

 
At 6:46 AM, Blogger Prasad Chaphekar said...

@bipin: swargat kasa jaaycha he saitanach jasti changla sangu shakto asa maza mat aahe.. :)

 
At 9:22 PM, Blogger Sushant said...

खूप छान मित्रा!
अगदी पाडगावकर आठवले बघ!

(btw माझं नाव सुशांत खोपकर.
मकरंद आणि शशांक आपले common friends आहेत.)

 

Post a Comment

<< Home